नाना - नाणी पार्कचा लोकार्पण सोहळा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून उभारलेल्या नाना नाणी पार्कचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गापासून जवळच महाराणा प्रताप चौक लगत शहर वासीयांसाठी नाना नाणी पार्क उभारण्यात आले. या पार्क मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी व त्यांच्या शारीरिक वृद्धी साठी येथे विविध क्रीडा साहित्य उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळी फिरण्यासाठी सिमेंट रस्ते केले आहे. येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपण मुळे अतिशय निसर्गरम्य वातावरणात नाना
नाणी पार्क उभारण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.

 याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी नगराध्यक्षा राजश्री निकम, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम
महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झंवर,
महिला आघाडीच्या मेघा शाह, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी अजगर पठाण, प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दीकी, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी तसेच विशाल जाधव, लक्ष्मण जगताप, रऊत बागवान, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल, अकील वसईकर, विठ्ठल सपकाळ, जुम्मा खा पठाण, राजू गौर, सुधाकर पाटील, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, मोईन पठाण, कुणाल सहारे, शेख सलीम हुसेन, अकील देशमुख, सचिन पाखरे, मुस्ताक देशमुख, सुनील पांडुरंग दुधे, अनिल कुरेशी, मतीन देशमुख राजेंद्र साठे, अल्वी मौलाना, शेख जाकीर, जमीर मुलतानी, शेख कलीम रमेश गुप्ता, भाऊराव दुथे, अजित पवार आदींची उपस्थिती होती.